Back

बातम्या

राजकारणात माळी समाजाचा टक्का वाढवायचा असेल तर माळी समाजाच्या लोकसंख्येबाबत संभ्रम दूर करणे आवश्यक आहे. अचूक आकडेवारीच राजकारणातील टक्का वाढवु शकते :: माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अविनाश ठाकरे यांचे प्रतिपादनDate: 05-Jan-2023


जिल्हा प्रतिनिधी नागपूर :
सावित्रीबाई फुले जयंती निमित्य आयोजित  "विविध क्षेत्रात माळी समाजातील महिलांचा टक्का" या विषयावर एकदिवसीय परीसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परीसंवाद अंतर्गत  "राजकारणात माळी समाजाच्या महिलांचा टक्का" या  विषया चे पुष्प गुंफतांना २०११ चा सेंसस व १९३२ च्या जातीनिहाय जनगणनेचा आधार घेऊन केलेल्या अभ्यासातून निष्पन्न झालेले निष्कर्ष  माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष श्री अविनाश ठाकरे यांनी मांडले. २०२६ च्या विधानसभा परीसीमन च्या वेळी जातीने लक्ष घालून समाजाला हिताचे राहील असे मतदार संघ निर्माण करण्यास राज्यकर्त्यांना बाध्य केले तर माळी समाजाचा राजकारणातील टक्का नक्की वाढलेला दिसेल  या करीता वेळ पडल्यास संघर्ष करण्याची तयारी ठेवा असे आवाहन करत व्हाट्सअप युनिव्हर्सिटी वरविश्वास  ठेऊन स्वतःच मत बनवू नका, इंटरनेट वर उपलब्ध माहितीचा अभ्यास करून निष्कर्षापर्यंत पोहोचता येत परंतु त्या करीता मेहनत करण्याची तयारी ठेवा असा सल्ला नव्याने समाज कार्यात आलेल्या तरुण समाजसेवकांना दिला.  . 
श्री.अविनाश ठाकरे यांचे भाषणातील मुख्य उतारा 
सावित्रीबाई फुले यांच्या पुण्याईने आज महिला सर्वच क्षेत्रात पुढे येत आहेत. राजकीय क्षेत्रात सुद्धा महिलांचा सहभाग वाढला आहे. माळी समाजाचा विचार करता राजकीय क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या महिलांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. राज्यमंत्री म्हणून श्रीमती रजनीताई सातव, आमदार म्हणून सौ. मनीषाताई चौधरी ,सौ.देवयानीताई फरांदे, व श्रीमती प्रज्ञा राजीव सातव राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सौ. रुपालीताई चाकणकर याच वर्तमानस्थितीत राजकीय पटलावर महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतात तर माजी आमदार कमल नानी ढोले पाटील, माजी आमदार दीप्तीताई चवधरी,  मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षा कडून लढलेल्या सौ . स्वातीताई वाकेकर हीच नावे आपल्याला माहित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये सुद्धा आजी माजी  महापौर म्हणून व आजी माजी  जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून संख्या १० च्या वर गेलेली दिसत नाही. महिला आरक्षण मुळे नगरपालिका व नगरपरिषद मध्ये काही प्रमाणात महिला नगराध्यक्ष झालेल्या दिसतात परंतु हि संख्या विदर्भात जास्त दिसते तर महाराष्ट्रातल्या इतर विभागात अगदी नगण्य आहे. 
लोकसंखेचा विचार केला तर माळी समाज हा ओबीसी मधला सर्वात मोठा घटक आहे तर महाराष्ट्रात दोन नंबर ची संख्या असलेला समाज आहे. हे जरी खर असलं तरी माळी समाजाच्या लोकसंखे बाबत बहुतेकांच्या मनात संभ्रम आहे आणि राजकारणात माळी  समाजाचा टक्का वाढवायचा असेल तर हा संभ्रम दूर हॊणे  गरजेचं आहे. १९३२ च्या लोकसंखे नुसार माळी समाज हा ११ ते १२ टक्के असल्याचे समोर येते.२०११ च्या सेन्सस ची अधिकृत आकडेवारी व त्यात १० वर्षातील संभावित वाढ करून सद्यस्थितीत  महाराष्ट्राची लोकसंख्या ११ करोड गृहीत धरून आणि परप्रांतातून महाराष्ट्रात वास्तव्याला आलेल्या माळी समाज बांधांवची संख्या पकडून माळी समाजाची संख्या हि सव्वा ते दीड करोड असायला हरकत नाही. राजकीय फायद्याकरिता हा आकडा कदाचित काही लोक फुगवून सुद्धा सांगत असतील आणि त्यात काही गैर देखील नाही  परंतु निवडणूक जिंकण्या करीता अचूक अभ्यास आणि विश्लेषण आवश्यक आहे. एकूणच सर्व बाजूनी अभ्यास केल्या नंतर सव्वा ते दीड  करोड हा आकडा योग्य वाटतो कारण महाराष्ट्रात  ३५ जिल्हे आहेत. माळी  समाज हा ग्रामीण भागात जास्त वसलेला असल्याने कोकण विभाग आणि मुंबई उपनगर चे  ६ जिल्हे ज्यांची लोकसंख्या २०११ च्या सेन्सस प्रमाणे २.५ करोड आहे यात माळी समाजाची संख्या अगदीच नगण्य आहे. जी या विभागातील एकूण लोकसंख्येच्या ३ ते ४ टक्केच आढळते. उर्वरित महाराष्ट्राची लोकसंख्या उरते ती ८.५ करोड यात पश्चिम महाराष्ट्रातील ५ जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातले ५ जिल्ह्ये ,मराठवाड्यातील ८ जिल्हे, आणि विदर्भातील ११ जिल्हे यात विभागली आहे. यातही नंदुरबार, नांदेड, हिंगोली, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली, वर्धा, यवतमाळ व लातूर या ९ जिल्ह्यांमध्ये माळी समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ५ टक्केपेक्षा जास्त नाही. नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशीम, सातारा, बीड, जालना ,संभाजीनगर, परभणि, धाराशिव व धुळे या ११ जिल्ह्यांमध्ये एकूण लोकसंख्येच्या ८ ते १२ टक्के पर्यंत कमी अधिक प्रमाणात आढळून येतो त्यातही ग्रामीण भागात प्रमाण जास्त आहे . अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, जळगाव, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, पुणे या ९ जिल्ह्यांमध्ये एकूण लोकसंख्येच्या १५ ते २० टक्के च्या प्रमाणात माळी समाज आढळून येतो.  १२ टक्के वरील लोकसंख्या असलेला आकडा निवडणूक जिंकण्या करीता सोयीचा आहे परंतु २००९ ला मतदार संघाची पुनर्रचना करतांना माळी समाजाच्या मतदानाचे विभाजन होईल अशा प्रकारचे मतदार संघ तयार करण्यात आल्याचे दिसते त्यामुळे बहुसंख्य मतदार संघ असे आहेत जिथे माळी समाजाची मतदारसंख्या आपल्याला  १५ हजारापेक्षा कमी आढळून येते  २८ मतदार संघ असे आहेत जिथे माळी समाजाची मतदारसंख्या ३० ते ३५  हजाराच्या वर दिसणार नाही ५ मतदार संघ असे आहेत जिथे माळी समाजाची मतदार संख्या ४० ते ४५ हजार मताच्या वर दिसणार नाही. एक मतदार संघ आहे ज्यात माळी समाजाची मतदार संख्या ५० ते ५५ हजार आढळून येते आणि एक मतदार संघ असा आहे जिथे माळी समाजाची मतदार संख्या ६० हजार पेक्षा जास्त आढळून येते.  त्यावेळी सत्तेत असलेल्या माळी समाजातील नेत्यांनी लक्ष दिले असते तर आज माळी समाजाला राजकीय पक्षा  कडून मोठ्या प्रमाणात उमेदवारी मिळाली असती आणि माळी समाजाचा राजकीय टक्का वाढला असता. आता माळी समाजाचा उमेदवार फक्त समाजाच्या मतांवर हमखास निवडून येईल असे दोनच मतदार संघ आहेत आणि ते देखील नाशिक जिल्ह्यात आहेत. म्हणूनच आपण बघतो एकेकाळी १९-२० आमदार निवडून यायचे आता ५ ते ७ च्या वर आपले विधान सभा सदस्य नसतात. आजमितीला एकूण ५ विधान सभा सदस्य आणि ३ विधान परिषद सदस्य आहेत. हि माहिती खरतर माळी समाजातील जनगणनेचे जे अभ्यासक आहे त्यांनी समाजाच्या प्लॅटफॉर्म वर मांडून, आहे त्या परिस्थिती जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील या करीता सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नियोजन करणे गरजेचे आहे परंतु तेच जर एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रवक्त्या प्रमाणे भूमिका मांडत असतील तर समाज कुणाकडे बघेल. खरंतर मी सांगितलेली आकडेवारी अचूक आहे असं माझं मुळीच म्हणणं नाही परंतु अभ्यासाने एका निष्कर्षापर्यंत येणं शक्य आहे, महाराष्ट्रात माझा जो प्रवास झाला त्या प्रवासात स्थानिक समाज बांधवांकडून मिळालेली माहिती ज्यात जिल्ह्यात तालुके किती तालुक्यात गावे किती त्यातील माळी बहुल गावे किती शहरात माळी बहुल वस्त्या किती सरकारी कार्यालयात असलेले माळी समाजाचे कर्मचारी विविध भागात असलेल्या माळी समाजातील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांसोबत होत असलेली चर्चा विविध भागातील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची संख्या, उद्योजकांची संख्या, पतसंस्थांची संख्या, शैक्षणिक संस्थांची संख्या याचा आढावा आम्ही माळी संघ च्या माध्यमातून सतत घेत असतो यातून मिळालेली माहिती इंटरनेट च्या माध्यमातुन सरकारी आकड्यांसोबत मॅच करतो आणि त्यातून एका निष्कर्षा पोहोचतो. मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे मला स्टॅटिस्टिकल अनालिसिस चा छंद आहे. माझ्या स्वतःच्या निवडणुकांचे निकाल मी लोकांना  निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर सांगितले आणि ते तंतोतंत खरे देखील निघाले त्यामुळे माझा माझ्या निष्कर्षावर पूर्ण विश्वास आहे. आज इन्फॉरमेशन टेकनॉलॉजि चे युग आहे सर्व माहिती इंटरनेट वर  उपलब्ध आहे लोकसंख्येच्या बाबतीत अनेक मान्यवरांचे एनालिसिस उपलब्ध आहेत या सर्वांचा तुम्ही सुद्धा अभ्यास केला तर तुम्ही सुद्धा मी काढलेल्या निष्कर्षा पर्यंत पोहोचू शकता. 
जाता जाता एकाच संगील २०२६ ला सर्व विधासभा क्षेत्राचे परीसीमन  होणार आहे. या परीसीमानाच्या वेळी माळी बहुल मतदार संघ बनावे या करीता आपल्याला सतर्क राहावे लागेल आणि ते करून घेण्याकरीता सामूहिक प्रयत्न करावे लागतील हे आपण करू शकलो तर राजकारणातील माळी समाजाचा टक्का वाढेल आणि अनुषंगाने माळी समाजातील महिलांचा टक्का देखील वाढेल.