माळी महासंघाची स्थापना १९८२ ला अध्यक्ष अँड. आनंदराव गोडे साहेब व संस्थापक विश्वस्त स्व. रामराव बापूराव खरात, स्व. श्री. रावसाहेब कृष्णराव भेलकर, श्री. प्रभाकर जगन्नाथ गहुकर, श्री. भानुप्रताप विश्वनाथ साखरे, श्री. यादवराव विठोबाजी चिमोटे, श्री. मेघश्याम पुंडलिक लंगडे, स्व. मनोहर कृष्णराव भुजाडे, श्री. मधुसुधन महादेवराव देशमुख, डॉ. श्रीकृष्ण संपतराव नवलकर, प्रा. भीमराव संपतराव खोडस्कर यांनी केली होती व यामाध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले. खऱ्याअर्थाने माळी समाजाची पहिली नोंदणीकृत संस्था म्हणून ही संस्था नावारूपाला आली. कालांतराने त्यातील काही विश्वस्तांचा मृत्यू झाला व वृध्यपकाळ आल्याने काही विश्वस्तांच्या कामाची गती मंदावली व कामकाज मागे पडले. यादरम्यान अनेकांनी हे कार्य पुढे चालविण्याकरिता माळी महासंघाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली परंतु विश्वस्त मंडळ चांगल्या चमूच्या शोधात होते.

    मध्यंतरीच्या काळात माळी उद्योजक फोरम Kjffoscia चे संस्थापक श्री. अविनाश ठाकरे व त्यांची चमू यांनी समाजबांधणीचे कार्य सुरु केले व समाजबांधणीला गती देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन तत्कालीन विश्वस्त मंडळाने माळी महासंघ चालविण्याची जबाबदारी श्री.अविनाश ठाकरे व त्यांची चमू यांच्याकडे दिनांक १२ डिसेंबर २०१६ रोजी विश्वस्त मंडळ ठराव घेऊन सोपवली. कायदेशीर बाबींची पूर्तता करून खऱ्या अर्थाने संपूर्ण कागदोपत्री नवी विश्वस्तांची नोंदणी होण्याकरीता दीड वर्षाचा कालावधी लागला व ४ एप्रिल २०१८ रोजी सरकारी कागदांमधून नवीन विश्वस्त मंडळाची सूची व घटनेतील बदल या बाबींना धर्मदाय आयुक्तांतर्फे मान्यता देण्यात आली .

    ११ एप्रिल २०१८ पासून नवीन सभासद नोंदणी सुरु करून ११ मे २०१८ रोजी राज्यस्तरीय, विभागीय व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची पहिली यादी घोषित केली व या नंतर ११ मे हाच माळी महासंघाचा स्थापना दिवस राहील अशी घोषणा विश्वस्त मंडळाने केली. माळी महासंघ हि संघटना Trust act अंतर्गत नोंदणीकृत असल्याने अधिकृत रित्या सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. माळी महासंघाच्या घटने नुसार दोन प्रकाचे सभासद असून आजीवन सभासद शुल्क रु ५००/- आणि वार्षिक सर्वसाधारण सभासद शुल्क रु ५०/- असे ठरविण्यात आलेले आहे .संस्थेमध्ये पदाधिकारी बनण्यास इच्छुक असणाऱ्यांना आजीवन सभासद होणे अनिवार्य असुन या सभासदांना मतदानाचा अधिकार राहील व हेच सभासद निवडणुक किंवा नियुक्तीच्या माध्यमातून माळी महासंघाचे राज्यस्तरीय/विभागस्तरीय/जिल्हास्तरीय/तालुकास्तरीय/गावपातळीवरील पदाधिकारी बनु शकतात तर वार्षिक सभासदांना त्यांच्या सभासदाच्या कार्यकाळात निवडणुक लागल्यास मतदानाचा हक्क बजविता येईल.


ध्येय आणि उद्देश

समाज प्रगतीच्या नव्या वाटा माळी महासंघ
 भारतातील संपूर्ण माळी समाजाचा समग्र विकास
 विखुरलेल्या समाजाचे एकत्रीकरण
 समाजाच्या शैक्षणिक ,सामाजिक, आर्थिक ,राजकीय उत्थानाकरिता एकसंघ बांधणी


प्रगतीची आस परिवर्तनाची कास माळी महासंघ
 समाजातील शैक्षणिक ,सामाजिक, आर्थिक ,राजकीय प्रगतीकरिता विविध धोरणांची आखणी व अंमलबजावणी
 आखलेल्या धोरणांच्या काटेकोर अंबलबजावणी करिता प्रशिक्षित मानव संसाधन निर्मिती
 प्रशिक्षित मानव संसाधनाच्या माध्यमातुन महामानवांच्या विज्ञानवादी विचारांवर आधारित प्रबुद्ध समाज निर्मिती


नव्या युगाची नवी चाहूल माळी महासंघ
 भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार सरकारी अनुदानांच्या योजनांचा समाजामध्ये प्रचार आणि प्रसार
 आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून समाजाची सामाजिक, आर्थिक ,सांस्कृतिक व राजकीय परिस्थिती बदलण्याचा संकल्प
 उपक्रमता आणि उद्यमशीलता यांच्या संगमाने व्यक्तित्व विकास


माळी महासंघाची राज्यघटना

संस्थापक विश्वस्त

अँड. आनंदराव गोडे
अध्यक्ष
श्री. मधुसुधन महादेवराव देशमुख
डॉ. श्रीकृष्ण संपतराव नवलकर
श्री. यादवराव विठोबाजी चिमोटे
प्रा. भीमराव संपतराव खोडस्कर
स्व श्री. रावसाहेब कृष्णराव भेलकर
स्व. मनोहर कृष्णराव भुजाडे
स्व. रामराव बापूराव   खरात
श्री. प्रभाकर जगन्नाथ गहुकर
श्री. भानुप्रताप विश्वनाथ साखरे
श्री. मेघश्याम पुंडलिक लंगडे