समाज सेवा, चळवळ व संघटण या तीन भिन्न बाबी परंतु आजपर्यंत या तीन्ही बाबींच्या वेगवेगळ्या पैलुंचा ऊलगडा न करता माळी वाटचाल होतांना आपण बघत आलो आहे. संघटण या सदराखाली कधी चळवळ चालविल्या गेली तर कधी सामाजीक उपक्रमाच्या माध्यमातुन समाजाच्या काही घटकांना सेवा देण्याचा प्रयंत्न झाला. या बाबींचा मानसशास्त्रिय दृष्टिकोनातुन विचार केला तर या सर्व घटनांमागे कधी देणाऱ्याचा तर कधी घेणाऱ्याचा स्वार्थ दडला असतो. स्वार्थ संपला की चळवळ थांबते व सेवाभाव संपुष्टात येतो आणि याच गोष्टि संघटनेला मारक असतात.
संघटण म्हणजे सामाजीक उध्दाराच्या व सामाजीक एकत्रिकरणाच्या प्रदर्शनातुन समाजाला लाभ व्हावा याकरीता केलेली संस्थात्मक बांधणी. या प्रक्रीये मधे व्यक्ति व्यक्तिला जोडत जातो व जी साखळी तयार होते ती साखळी कधीच तुटत नाही आणि जरी तुटली तरी साखळीतली एखादी कडी तुटते. या तुटलेल्या कडी च्या जागी दुसरी कडी लावली की परत अखंड साखळी तयार होते. संस्थात्मक बांधणी चा अजुन एक महत्वाचा भाग म्हणजे या प्रक्रीयेत व्यक्ति महत्वाचा नसुन धोरण व धोरणांची अंमलबजावणी महत्वाची असते. विशिष्ट धोरण निश्चित झाले की मग अंमलबजावणी करीता जोडलेल्या व्यक्तिची प्रशिक्षणाद्वारे चमु तयार करून धोरणांची काटेकोर अंमलबजावणी करणे सहज शक्य होते. या सर्व प्रक्रीयेतुन प्रशिक्षीत मानवसंसाधन आपोआपच निर्मित होत जाते व प्रबुध्द अश्या समाजाची निर्मिती होते.
माळी महासंघाची वाटचाल सद्दस्थितीत याच प्रक्रीयेतुन होत आहे. व व्यक्तिला व्यक्ति जोडत अवघ्या ३० दिवसात महासंघाची सदस्य संख्या ५०० चे वर पोहोचली. जे पदाधिकारी या प्रक्रिये मधे मनापासुन सहभागी झाले त्यांनी निश्चितच स्वत:मधे बदल अनुभवला असेल. त्यांच्यातील आत्मविश्वास त्यांच्या कृतीतून स्पष्ट जाणवायला लागला आहे. ही तर नुसती सुरवात आहे.. माळी महासंघाच्या धोरणा प्रमाणे जेव्हा एक लाख मावळे या प्रक्रीयेत सहभागी होतील तेव्हा होणाऱ्या क्रांतीची नांदी म्हणजे आज कार्यरत असलेल्या शंभर मावळ्यांचे कार्य.
अविनाश ठाकरे
अधक्ष माळी महासंघ
चेअरमन माळी ऊद्योजक फोरम
केजेफोसीआ