पांघरून चिंध्या
तोलला भार
वैराग्याचा सार
दाखविला ...... ।।१।।
हातात खापर
भूक नि तहान
मागितले दान
परिश्रमाचे...... ।।२।।
मुखात वऱ्हाडी
खळाळता झरा
आधार खरा
प्रबोधनाचा.....।।३।।
डोळस भक्तीला
जोड विवेकाची
शुद्ध मनाची
परमार्गी..... ..।।४।।
देवकीनंदन
दोन दगडात
जन कीर्तनात
गोपाला........।।५।।
मानवतेचा
रोकडा तो धर्म
बोलले ते कर्म
खराट्यातून...।।६।।
गांजलेल्यांची
हक्काची काठी
ढोंग्यांची पाठी
मार तिचा .....।।७।।
स्वार्थही वसतो
त्या देवळात
देव माणसात
भेटवीला......।।८।।
अरविंद शिंगाडे
खामगाव जिल्हा बुलढाणा
९४२३४४५६८८