Back

झालेले कार्यक्रम

सत्कार समारंभDate: 19-Nov-2018


“माळी महासंघ अकोट च्या वतीने समीक्षा नाथेचा सत्कार”
अमरावती विद्यापीठातून गुणवत्ता यादीत प्रथम आलेली कु. समीक्षा श्रीकृष्ण नाथे ही श्री शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थीनी असून हिने बी.कॉम. फायनलची परिक्षा दिली. त्यामध्ये तिने 82.06 टक्के मिळवून विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान मिळविला.
तिचे आईवडील मजुरी करणारे असून अशा परिस्थितीत तिने मिळवीलेल्या यशामुळे तिच्यासह तिच्या पालकांवर सुध्दा सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
माळी महासंघाच्यावतीने दि. 19/11/2018 ला समिक्षा नाथे हिचा सत्कार करण्यात आला. माळी महासंघ जिल्हाध्यक्ष मयुर निमकर, केशव बिलबिले, ॲड देवानंद फुसे (तालुका अध्यक्ष वकील संघ), निलेश काळे सर, नागेश इंगळे, मंगेश टाक यांनी मार्गदर्शन केले. तसेच वैभव डांगरे, किशोर बेलसरे, हर्षल खासबागे, विश्वजीत सुपासे, नितीन काळे, चक्रधर खलोकार, प्रणय टवले, योगेश बेलसरे, सुमित पवार, धिरज लहाने, अजय गवई, नंदु टेमझरे, सचिन खलोकार इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन किशोर लहाने तर आभार प्रदर्शन मिलींद हाडोळे यांनी केले.