Back

बातम्या

२२ मार्च २०२० जनता कर्फ्यु मधे माळी समाजाने सहभागी व्हावे ::माळी महासंघ अध्यक्ष आणि माळी उद्योजक फोरम चेअरमन अविनाश ठाकरे यांचे आवाहन



Date: 20-Mar-2020


प्रतिनिधी: 
कोरोना व्हायरस च्या प्रकोपा पासून देशाला मुक्त ठेवण्या करीत, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च २०२० रोजी सकाळ पासून तर संध्याकाळ पर्यंत जे जनता कर्फ्यु आवाहन केले आहे त्या अनुषंगाने माळी  समाजाने या जनता कर्फ्यू मधे सहभागी होऊन देशहिताच्या या युद्धाचे सैनिक बनावे असे आवाहन माळी उद्योजक फोरम केजेफोसीआ आणि माळी महासंघ यांचे वतीने मा. अविनाश ठाकरे यांनी केले आहे. माळी समाजातील शेतकरी, उद्योजक, व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी यांनी सकाळ पासून तर रात्री पर्यंत घरातच थांबावे अशी विनंती देखील केली आहे. १२ मार्च पासून ३६ देशातील नागरिकांना भारतात येण्यास सरकार तर्फे मनाई केली आहे व ११ देशातील नगरीकांना विमानतळावरूनच विलगीकरण केंद्रात पाठवले जात आहे. महाराष्ट्रातील ज्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत त्यांना २० तारखे पासून लॉकडाऊन केले आहे. सर्व परीक्षा , व सरकारी कार्यक्रम देखील पुढे ढकलण्यात आले आहे. २२ तारखेला सर्वानी या जनता कर्फ्यू मधे सहभाग घेतला तर कोरोना व्हायरस च्या तिसऱ्या चरणातल्या प्रवेशाला आळा बसण्याची शक्यता आहे. या दिवशी फावल्या वेळात माळी महासंघ च्या वेबसाईट वर असलेले महात्मा जोतीराव फुले यांचे अखंड साहित्य आणि माता सावित्री फुले यांचे जीवन चरित्राचे वाचन करावे असे देखील आवाहन मा. अविनाश ठाकरे यांनी केले.