Back

बातम्या

माळी महासंघ विश्वस्त मा. काळुराम अण्णा गायकवाड यांना पितृशोकDate: 09-Mar-2020


माळी महाससंघ विश्वस्त मा. काळुराम अण्णा गायकवाड यांचे वडील श्री. नामदेव शिवराम गायकवाड यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दिनांक ०९/०३/२०२० रोजी सकाळी ९-०० वाजता शिक्रापूर तालुका शिरूर येथील नदी तीरावर करण्यात आला. त्यांच्या मागे शिक्रापूर तंटा मुक्ती समितीचे मा. अध्यक्ष उत्तम नाना गायकवाड यांचे सह चार मुले व एक मुलगी आणि नातवंड, पतवंडांचा मोठा गोतावळा आहे. त्यांनी शेती व्यवसाय च्या माध्यमातुन मुलांचे योग्य संगोपन करून उच्चशिक्षित केले. माळी महासंघ परिवाराकडुन मृतात्म्यास विनम्र श्रद्धांजली.