Back

बातम्या

पंढरपूर च्या विठ्ठल भवन मध्ये निशा फुले आणि अजिंक्य देवमारे यांचा पहिला सत्यशोधक विवाह सम्पन्न..Date: 28-May-2019


पंढरपूर -विठुरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंढरी नगरीत सामजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले यांनी सांगितल्या प्रमाणे सत्यशोधिका निशा फुले आणि  सत्यशोधक अजिंक्य देवमारे यांचा   पंढरपुरातील पहिला सत्यशोधक विवाह विठ्ठल भवन येथे 26 मे 2019 रोजी दु.12.30 वाजता पुणे येथील फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रा तर्फे  रघुनाथ ढोक ,सदस्य महात्मा फुले साहित्य प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन यांनी महात्मा फुले यांचे वेशभूषेत लावला.निशा फुले ह्या उच्चशिक्षित असून झेप फौंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा म्हणून काम करतात आणि महाराष्ट्रभर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवनावर  व्याख्याते म्हणून प्रबोधन करतात.त्यामुळे या सत्यशोधक विवाह प्रसंगी आमदार भारत भालके,युवा नेते प्रणव परिचारक ,नगरसेवक डी. राज सर्वगोड,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट समता परिषदेचे चंद्रशेखर जाधव,सय्याजी बनसोडे,सावता महाराज वंशज रमेश महाराज वसेकर,सावता जाधव,रमाकांत पाटील,संतोष राजगुरु,चार्टर्ड इंजिनियर विष्णु बनकर, युवानेते भगीरथदादा भालके, आदि मान्यवर उपस्थित होते..
       यावेळी सत्यशोधक विवाहाचे सुरुवातीला रघुनाथ ढोक यांनी सत्यशोधक विवाहाबाबत मौलिक माहिती दिली.त्यानंतर नवदाम्पत्यांचे शुभहस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे अर्ध पुतळ्यांना पुष्प हार अर्पण करण्यात आला.ह्या  विवाहाची सत्यशोधक विवाह रजिस्टरमध्ये नोंदणी करून  सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा रघुनाथ ढोक यांनी भेट दिली.महात्मा फुले रचित मंगलाष्टक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त सुदाम धाडगे,आकाश ढोक यांनी म्हंटले. फुले शाहू आंबेडकर यांचे विचाराने कार्य करणारी तरूण पिढीतील कार्यकर्ते,विचारवंत मोठ्या संख्यने महाराष्ट्र भरातून उपस्थित होते  
त्यामुळे या  विवाहाचे कौतुक होऊन या नवदाम्पत्यांसोबत अनेकांनी सेल्फी फोटो काढले.