Back

बातम्या

निगडी (पुणे) येथील ओएमडब्लू लॉजिस्टिक्सच्यावतीने ज्येष्ठ महीलांचा अमृतमहोत्सवी सन्मान सोहळा संपन्नDate: 11-Mar-2019


जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून निगडी येथील ओएमडब्लू लॉजिस्टिक्स प्रा. लि. कंपनीचे अध्यक्ष श्री. मदन वाघमारे यांच्या पुढाकाराने ओंकार बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हाडगा (निलंगा लातूर) येथील ५१ ज्येष्ठ महीलांचा अमृतमहोत्सवी सन्मान सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
        अगदी गरीब कुटुंबात जन्मलेले मदन वाघमारे हे पिंपरी पुणे येथील टाटा मोटर्सचे स्वेच्छानिवृत्त कामगार यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर कमी कालावधीत उद्योजक म्हणून ख्याती मिळवली. आपण कितीही मोठे झालो तरी समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने त्यांनी ओंकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात मोफत आरोग्य शिबीर, रक्तदान, गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप, आदि सामाजिक-शैक्षणिक उपक्रम राबविले. शुक्रवार, दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त स्वतःच्या आईसह विविध जाती-धर्मातील ५१ ज्येष्ठ महीलांचा अमृतमहोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करुन ज्येष्ठ महिलांना आनंद-समाधान दिले.  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवाजी डोके तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक बालाजी सूर्यवंशी, चार्टर्ड इंजिनियर विष्णु बनकर उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून पुणे येथील आर्किटेक्ट तथा कवी, लेखक श्री राजेंद्र कोरे यांनी स्त्रीशक्तीविषयी महत्त्व सांगुन महिलांनी रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करून आनंदी कसे राहायचे, हे पटवून दिले. सायंकाळी आळंदी येथील बाल किर्तनकार स्वातीताई बडे यांच्या किर्तन सेवेने उपस्थितीत मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव लांडगे तर आभार लक्ष्मण बिराजदार यांनी मानले.
       कार्यक्रम यशस्वीतेसाठी मदन वाघमारे, नागनाथ वांजरवाडे, अमर मुगावे, अमर बुरबुरे, श्रीमंत जाधव, सौ मंदाकिनी वाघमारे, परशुराम वाघमारे, राम वाघमारे, संदीपान वाघमारे, दत्तात्रय दापके, गोविंद सुर्यवंशी, धनाजी वाघमारे, गोपीनाथ वाघमारे, मनोज लवटे, राम नरवटे, पवन पांचाळ, बब्रुवान वाघमारे, कमलाकर डोके, आदिंनी परिश्रम घेतले.