Back

बातम्या

उद्योगपती मदन वाघमारे यांना स्मार्ट उद्योजक पुरस्कारDate: 05-Feb-2019


उद्योगपती मदन वाघमारे यांचा स्मार्ट उद्योजक पुरस्काराने गौरव

यावेळी चार्टर्ड इंजिनियर विष्णु बनकर यांनी नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे होऊ असा कानमंत्र देऊन, टाटा मोटर्सचे कामगार ते यशस्वी उद्योजक असा संघर्षमय प्रेरणादायी प्रवास करणाऱ्या जिद्दी-ध्येयवेड्या श्री. मदन वाघमारे साहेब यांचा आदर्श घेऊन युवकांनी उद्योगभरारी घ्यावी तसेच उद्योग मार्गदर्शनासाठी संपर्क करावा, असे आवाहन केले.

उद्योग-व्यवसाय वृद्धीसाठी व नवनवीन उद्योजक निर्मितीसाठी माळी साम्राज्य आयोजित राज्यस्तरीय उद्योजक मेळाव्यामध्ये निगडी प्राधिकरण, पुणे येथील ओ.एम्.डब्लू. लॉजिस्टिक्स प्रा. लि., पुणे या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. मदन वाघमारे यांना दि. ०३ फेब्रुवारी रोजी जळगाव येथे संत शिरोमणी सावता महाराज यांचे १८वे वंशज रविकांत महाराज वसेकर, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, स्टेट बँकेचे मा. शाखाधिकारी श्रीकृष्ण महाजन, जळगाव उद्योग आधार केंद्राचे महाव्यवस्थापक एस्. एच. पाटील, माळी साम्राज्यचे भुषण महाजन, आदि मान्यवरांच्या शुभहस्ते स्मार्ट उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदर पुरस्कार त्यांना त्यांच्या कंपनीच्या स्मार्ट कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आला. यावेळी चार्टर्ड इंजिनियर विष्णु बनकर, अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष उद्योजक श्री. गोविंद डाके, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, उद्योजक अर्जुन गायकवाड, उद्योजक दिलीप पाटील, राखी रासकर, शालीग्राम मालकर, यांच्यासह विविध क्षेत्रातील उद्योजक व सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्री. वाघमारे यांना यापूर्वीही फास्टेस्ट ग्रोविंग इंडियन कंपनी एक्सलन्स अवार्ड, उद्योगभूषण, महात्मा फुले समाजरत्न, संत सावताभूषण, आदि. पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 
यावेळी महापौर राहुल जाधव, संत सावता माळी युवक संघाचे अध्यक्ष महाराष्ट्रभुषण श्री. सचिन गुलदगड, उद्योजक फोरमचे विश्वस्त उद्योजक काळूराम आण्णा गायकवाड, कंपनी अधिकारी, कर्मचारी, सेवकवर्ग आदिंनी अभिनंदन केले.

घरची परिस्थिती हालाखीची असल्याने दोन वेळेच्या पोटाची खळगी भरण्यासाठी नोकरीच्या शोधात पुणे येथे आलेले
मदन वाघमारे हे अल्पभूधारक कुटुंबातील हाडगा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर येथील  असुन पिंपरी, पुणे येथील टाटा मोटर्सचे कामगार होते. टाटा मोटर्समध्ये काम करत असताना महात्मा फुले यांना आदर्शस्थानी तर रतन टाटा यांना प्रेरणास्थानी मानून स्वतःच्या उद्योगाची  उभारणी करण्याचे ध्येय बाळगले. जिद्द व कठोर परिश्रमाच्या जोरावर अनेक आव्हानांना सामोरे जाऊन स्वतःच्या ओएमडब्ल्यू लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना केली. अगदी कमी वयातच स्मार्ट कामगिरीमुळे या कंपनीला घवघवीत यश मिळाले. आज  दीडशेच्यावर कंपनीच्या बसेस, छोट्या कॅब, कर्मचारी आहेत. श्री. वाघमारे हे असामान्य, गतिमान, कष्टाळू, जिद्दी उद्योजक आहेत.
त्यांच्याकडे प्रेरणादायी उद्योजक म्हणून पाहिले जाते. उद्योगाबरोबरच समाजसेवेचा वसा त्यांनी घेतला आहे. त्यांनी केलेल्या अप्रतिम कार्याची दखल घेऊन त्यांना अहमदनगर, पुणे, मुंबई, सातारा, लातूर, दिल्ली आदि ठिकाणी विविध उत्कृष्ट पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच जळगाव येथे स्मार्ट उद्योजक पुरस्कार देऊन गौरविल्याबद्दल श्री. वाघमारे यांनी धन्यवाद मानले! उद्योगातील प्रगतीसाठी सचोटी बरोबरच संयम, सातत्य व परिश्रम महत्त्वाचे असल्याचे वाघमारे यांनी पुरस्कारास प्रत्युत्तर देताना नमूद केले. अौद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड, पुणे तसेच लातूर परीसरामध्ये त्यांचे कौतुक होत आहे.

संत शिरोमणी सावता महाराज यांचे १८वे वंशज रविकांत महाराज वसेकर, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, स्टेट बँकेचे मा. शाखाधिकारी श्रीकृष्ण महाजन, जळगाव उद्योग आधार केंद्राचे महाव्यवस्थापक एस्. एच. पाटील, माळी साम्राज्यचे भुषण महाजन आदि मान्यवरांच्या शुभहस्ते स्मार्ट उद्योजक पुरस्कार स्वीकारताना ओ.एम्.डब्लू. लॉजिस्टिक्स प्रा. लि., पुणे कंपनीचे अध्यक्ष श्री. मदन वाघमारे.

यावेळी चार्टर्ड इंजिनियर विष्णु बनकर यांनी नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे होऊ असा कानमंत्र देऊन, टाटा मोटर्सचे कामगार ते यशस्वी उद्योजक असा संघर्षमय प्रेरणादायी प्रवास करणाऱ्या जिद्दी-ध्येयवेड्या श्री. मदन वाघमारे साहेब यांचा आदर्श घेऊन युवकांनी उद्योगभरारी घ्यावी तसेच उद्योग मार्गदर्शनासाठी संपर्क करावा, असे आवाहन केले.