Back

बातम्या

१ जानेवारी फुले दांम्पत्य सन्मान दिन रॅलीमधे सहभागी होण्याचे मा. अविनाश ठाकरे यांच्याकडून आवाहनDate: 29-Dec-2018


दरवर्षी प्रमाणे यंदाही १ जानेवारी फुले दांम्पत्य सन्मान दिन रॅली चे आयोजन भिडे वाडा ते फुले वाडा पुणे येथे करण्यात आले आहे. १ जानेवारी १८४८ रोजी महात्मा फुले आणि सावित्रीआई फुले यांनी मुलींची पहीली शाळा सुरू केली, या दिवसाचे औचित्य साधुन समाजाने स्वयंस्फुर्तीने महात्मा फुले व सावित्रीआई आई फुले यांचे नावाने एकत्र यावे या संकल्पनेतुन २०१४ पासुन या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे.

कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रीका आम्ही छापत नाही याऐवजी माळी समाजातील राजकीय अथवा सामाजीक नेते मंडळींना रॅलीत सहभागी होण्याची विनंती करतो व समाजबांधवांना चलो पुणे चा नारा देऊन सवयंप्रेरणेने स्वखर्चाने सहभागी होण्याचे आवाहन करीत असतो.

या आवाहनाला प्रतिसाद देत हजारोंच्या संखेने माळी समाज पुण्याला दरवर्षी पोहचत असतो. दरवर्षी या रॅलीत सहभागी होणाऱ्या समाजबांधवांची संख्या वाढतच आहे.

या वर्षी सुध्दा समाजबांधव, सामाजीक संघटणा व राजकीय पक्षातील नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी रॅली मधे सहपरीवार सहभागी व्हावे असे आवाहन अविनाश ठाकरे यांच्याकडून करण्यात आले.