Back

बातम्या

उद्योगपती मदन वाघमारे यांचा फास्टेस्ट ग्रोविंग इंडियन कंपनी एक्सलन्स अवार्डने गौरवDate: 11-Dec-2018


उद्योगपती मदन वाघमारे यांचा सर्वोत्कृष्ट पुरस्काराने गौरव

टाटा मोटर्सचे कामगार ते यशस्वी उद्योजक असा प्रवास करणाऱ्या जिद्दी-ध्येयवेड्या मदन वाघमारे यांना सलाम..! शुन्यातून प्रगतीकडे गरूडभरारी...
इंटरनॅशनल अचिव्हर्स कॉनफरन्स तर्फे निगडी प्राधिकरण येथील ओ.एम्.डब्लू. लॉजिस्टिक्स प्रा. लि., पुणे या कंपनीचे डायरेक्टर श्री. मदन वाघमारे यांना नुकतेच दिल्ली येथे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री मणिशंकर अय्यर यांच्या शुभहस्ते फास्टेस्ट ग्रोविंग इंडियन कंपनी एक्सलन्स अवार्ड देऊन गौरविण्यात आले. सदर पुरस्कार त्यांना त्यांच्या कंपनीच्या अतुलनीय कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आला. यावेळी चार्टर्ड इंजिनियर विष्णु बनकर, टाटा मोटर्सचे व्यवस्थापक अमोल बनकर, उद्योजिका माधुरी कोकाटे, उद्योजक पराग मुलगुंड, महापौर राहुल जाधव, कंपनी कर्मचारी, सेवकवर्ग आदिंनी अभिनंदन केले. श्री. वाघमारे यांना यापूर्वीही उद्योगभूषण, महात्मा फुले समाजरत्न, संत सावताभूषण, आदि. पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

घरची परिस्थिती हालाखीची असल्याने दोन वेळेच्या पोटाची खळगी भरण्यासाठी नोकरीच्या शोधात पुणे येथे आलेले
मदन वाघमारे हे शेतकरी कुटुंबातील हाडगा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर येथील असुन पिंपरी, पुणे येथील टाटा मोटर्सचे कामगार होते. टाटा मोटर्समध्ये काम करत असताना महात्मा फुले यांना आदर्शस्थानी तर रतन टाटा यांना प्रेरणास्थानी मानून स्वतःच्या उद्योगाची उभारणी करण्याचे ध्येय बाळगले. जिद्द व कठोर परिश्रमाच्या जोरावर अनेक आव्हानांना सामोरे जाऊन स्वतःच्या ओएमडब्ल्यू लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना केली. अगदी कमी वयातच या कंपनीला घवघवीत यश मिळाले. आज दीडशेच्यावर कंपनीच्या बसेस, छोट्या कॅब, कर्मचारी आहेत. श्री. वाघमारे हे असामान्य, गतिमान, कष्टाळू, जिद्दी उद्योजक आहेत.
त्यांच्याकडे प्रेरणादायी उद्योजक म्हणून पाहिले जाते. उद्योगाबरोबरच समाजसेवेचा वसा त्यांनी घेतला आहे. त्यांनी केलेल्या अप्रतिम कार्याची दखल घेऊन त्यांना अहमदनगर, पुणे, मुंबई, सातारा, लातूर आदि ठिकाणी विविध उत्कृष्ट पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच दिल्ली येथे *सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरविल्याबद्दल श्री. वाघमारे यांनी धन्यवाद मानले! उद्योगातील प्रगतीसाठी जिद्द, सत्य, बेडर व प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याचे वाघमारे यांनी पुरस्कारास प्रत्युत्तर देताना नमूद केले. अौद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड, पुणे तसेच लातूर परीसरामध्ये त्यांचे कौतुक होत आहे.