Back

बातम्या

मराठवाडा विभागाचीDate: 15-Oct-2018


बहुजन समाजाचे अज्ञान दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद, विषमता पाहून थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी १ जानेवारी १८४८ साली पुण्यामधील बुधवार पेठेतील भिडे  यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढुन तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाई वर सोपवली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची हि मुहूर्तमेढ ठरली या दिवसाचे औचित्य साधून महात्मा फुले दाम्पत्याचा सन्मान व्हावा म्हणुन अविनाशभाऊ ठाकरे अध्यक्ष माळी महासंघ आणि चेअरमन माळी उद्योजक फोरम केजेफॉसिआ यांच्या संकल्पनेतुन गेल्या पाच वर्षापासुन साजरा होत आहे. १ जानेवारी २०१९ रोजी माळी महासंघ आणि माली समाजबांधव यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे भिडेवाडा ते फुले वाडा माहेरॅली चे आयोजन करण्यात येत आहे. या रॅली मध्ये मराठवाडा विभागातून जास्तीत जास्त समाज बांधव सहभागी व्हावे या नियोजना करिता बैठकीचे आयोजन माळी महासंघाचे विश्वस्त व  महारॅली चे प्रदेश संयोजक श्री काळुराम गायकवाड , माळी महासंघ युवा दल प्रदेश अध्यक्ष श्री किशोर राऊत, मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री संतोष जमधडे यांचे नेतृत्वात करण्यात आले. या विषयावर जनजागृती करण्याकरिता शिर्डी येथील राज्यस्तरीय बैठकीत ठरल्याप्रमाणे विविध समित्यांचे गठन करण्यात आले व विविध उपक्रम राबविण्याचा निश्चय करण्यात आला . या मध्ये प्रामुख्याने ७ नोव्हेंबर रोजी तहसीलदारांना " १ जानेवारी " हा दिवस फुले दाम्पत्य सन्मान दिन साजरा करण्यात यावा या आशयाचे निवेदन देण्यात येईल तसेच २८ नोव्हेंबर रोजी भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक लवकर निर्माण होण्याकरिता भिडे वाडा संबंधी कोर्टात चालू असलेली केस फास्ट ट्रॅक कोर्टाकडे वळती करावी या आशयाचे निवेदन देण्याचे ठरले. 
या बैठकीला माळी महासंघ विभागीय अध्यक्ष शिक्षक दल श्री. रवी तारो , विभागीय अध्यक्ष युवदल  मराठवाडा श्री. योगेश पवार , विभागीय उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय बोरोडे ,औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष श्री. अशोक तारो, बीड जिल्हा अध्यक्ष श्री. पांडुरंग कोरडे, परभणी जिल्हा अध्यक्ष श्री. प्रभाकर इंगळे, हिंगोली जिल्हा अध्यक्ष डॉ. संदीप गोरे,  श्री . नारायण झरेकर ,शिक्षक दल जालना जिल्हा अध्यक्ष श्री. मुकुंद खरात,जालना शहर अध्यक्ष श्री. संतोष रासवे,पदाधिकारी राम देवकर सतीश तायडे,सुंदरराव कुदळे , ऍड गायकवाड साहेब,  श्री. हजारे साहेब,श्री. मयूर गाडेकर, श्री. साबळे सर, श्री. गणेशभाऊ तरासे , श्री. वाघमारे . उपस्थित होते.