Back

बातम्या

१ जानेवारी फुले दाम्पत्य सन्मान दिन महारॅली नियोजन बैठक संपन्न , माळी महासंघ ने उचलली आयोजना ची जबाबदारी , श्री काळुराम गायकवाड यांची  २०१९ महारॅली प्रदेश संयोजक पदी एकमताने निवडDate: 04-Oct-2018


दरवर्षी प्रमाणे यंदाही होऊ घातलेल्या १ जानेवारी फुले दाम्पत्य सन्मान दिन महारॅली च्या नियोजनाची तयारी सुरु झाली आहे. १ जानेवारी १८४८ रोजी महात्मा जोतीराव फुले व माता सावित्रीआई फुले यांनी पुणे शहरातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरु करून स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली या दिवसाचे औचित्य साधून मा. अविनाश ठाकरे यांचे संकल्पनेतून पुणे येथे भिडेवाडा ते फुलेवाडा "१ जानेवारी सन्मान दिन महारॅली" चे आयोजन करण्यात येते. दरवर्षी या आयोजनाची जबाबदारी माळी समाजातील वेगवेगळ्या संघटना अथवा व्यक्ती यांचे कडे दिली जाते. या वर्षी या महारॅली च्या आयोजनाची जबाबदारी माळी महासंघ ने उचलली आहे.या बैठकीला प्रामुख्याने माळी महासंघ चे अध्यक्ष श्री अविनाश ठाकरे, कोषाध्यक्ष श्री नानासाहेब कांडलकर , विश्वस्त श्री. भारत माळी , श्री अरुण तिखे, श्री काळुराम गायकवाड , श्री. कैलाश महाजन ,सामाजिक कार्यकर्ते श्री जे.के.कुदळे, यांचे सह माळीमहासंघ चे आघाडी, विभागीय,जिल्हा व शहर पदाधिकारी उपस्थित होते.  २०१५ पासून सुरु झालेल्या या रॅली च्या आयोजनाची २०१५ व २०१६ या वर्षी अखिल भारतीय माळी महासंघ या संघटनेने घेतली होती व संयोजक पदाची जबाबदारी श्री. अविनाश ठाकरे यांनी उचलली होती.  २०१७ व २०१८ साली माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ व अखिल माळी समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने या महारॅली चे आयोजन करण्यात आले होते व संयोजक म्हणून केजेफोसिआ चे डायरेक्टर व माळीनगर साखर कारखान्याचे एम.डी. श्री. रंजन गिरमे यांनी जबाबदारी पार पाडली. २०१९ च्या महारॅली च्या संयोजक पदी माळी महासंघ चे विश्वस्त श्री. काळुराम गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली.  श्री गायकवाड यांचे सोबतच सहसंयोजक या पदावर अहमदनगर येथील माळी उद्योजक फोरम चे  नॅशनल डायरेक्टर श्री. शंकरराव नेवसे, पिंपरी चिंचवड येथील  माळी उद्योजक फोरम चे  नॅशनल डायरेक्टर श्री. मदन वाघमारे आणि नाशिक येथील माळी महासंघ चे उत्तर महाराष्ट्र चे कर्मचारी आघाडी चे विभागीय अध्यक्ष श्री. जयवंत बागुल यांची निवड करण्यात आली. माळी महासंघ चे विभागीय अध्यक्ष श्री. संतोष जमदाडे , श्री नामदेव कोकोटे,श्री. राजेश जवारकर,श्री. अतुल क्षीरसागर यांची तर उत्तर महाराष्ट्र तुन सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेंद्र लोंढे यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई विभागाची घोषणा लवकरच करण्यात येईल.माळी महासंघ विश्वस्त श्री कैलाश महाजन यांची शिक्षण संस्था प्रदेश संयोजक पदावर निवड करण्यात आली तर माळी महासंघ युवादल अध्यक्ष  श्री. किशोर राऊत यांचे कडे युवादल , माळी महासंघ महिलादल अध्यक्ष यांचे कडे महिला दल,माळी महासंघ वैद्यकीय अध्यक्ष डॉ. आदित्य अहिरे यांचे कडे वैद्यकीय दल,माळी महासंघ सहकारदल अध्यक्ष श्री कडूभाऊ  काळे यांचे कडे सहकार दल , माळी महासंघ जेष्ठ नागरिक अध्यक्ष श्री.महादेवराव श्रीखंडे यांचे कडे जेष्ठ नागरिक दल तसेच सामाजिक कार्यकर्त्या कु. सपना माळी यांची युवती दल प्रदेश संयोजक पदावर निवड करण्यात आली. माळी महासंघ चे सर्व जिल्हा तसेच शहर अध्यक्ष हे त्यांच्या त्यांच्या जिल्हा व शहराचे संयोजक म्हणून काम पाहतील.या महारॅली च्या निमित्ताने विभागीय बैठक, जिल्हा बैठक, तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्या संबंधी नियोजन करण्यात आले ज्याची माहिती लवकरच समाजबांधवांना देण्यात येईल.