Back

बातम्या

धनश्री लेकुरवाळे आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी भारतीय संघातDate: 26-Sep-2018


योगा फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे गाजियाबाद (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या ४२ व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत मुलींच्या वरिष्ठ गटात नेत्रदीपक कामगिरीमुळे नागपूर च्या धनश्री लेकुरवाळे ची निवड तिरुवानंतपूरम (केरळ) येथे होणाऱ्या ८ व्या एशियन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप - २०१८ साठी झाली आहे. २७ ते ३० दरम्यान होणाऱ्या या अशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमधे ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. धनश्रीने २०१३ पासून सातत्याने एशियन तसेच जागतिक योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये ती सुवर्ण कामगिरी करत भारतासाठी १८ पदक जिंकली आहे.