Back

बातम्या

माळी महासंघ आणि माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ ची वाटचाल सुरवातीपासूनच समाजात उद्योग आणि व्यापार निर्माण करण्याच्या दिशेने : अविनाश ठाकरेDate: 27-Jan-2020


संघटन कशासाठी या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न केला तर या प्रश्नाचे एकाच उत्तर येईल समाजाचा फायदा. कोणता फायदा हे शोधण्याचा प्रयत्न केला तर अनेक उत्तर येतील कोणाचे उत्तर राजकीय फायदा, कुणाचे उत्तर सामाजिक फायदा कुणाचे उत्तर शैक्षणिक फायदा कुणाच्या दृष्टीने आर्थिक फायदा………………. किती लोकांना फायदा मिळवून दिला हा प्रश्न उपस्थित झाला तर मग मात्र उत्तर सापडत नाही कारण ज्याला लाभ मिळवून द्यायचा असा लाभार्थीच निश्चित नाही.

२०१४ साली जेव्हा पहिल्यांदा माळी समाजातील उद्योजक आणि व्यापारी यांना एकत्र करून आम्ही नागपूर  मधे  उद्योजक मेळावा आणि प्रदर्शनी भरवली होती तेव्हा १०५ व्यापारी आणि उद्योजकांनी सहभाग घेतला होता. आणि २०१५ साल च्या प्रदर्शनी मधे १३० व्यापारी आणि उद्योजकांनी सहभाग घेतला. दोन्ही वेळेला उद्योजक आणि व्यापारी यांचा सहभाग अतिशय चांगला होता आम्हाला मेहनत घ्यावी लागली ती ग्राहक या मेळाव्या पर्यंत पोहोचले  पाहिजे याकरीता. या दोन्ही मेळाव्याच्या अनुभवानंतर जेव्हा २०१६ ला माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ ची स्थापना केली त्यावेळी आम्ही दोन संकल्पनांची मांडणी केली. पहिली संकल्पना "One Brand One Community" आणि दुसरी संकल्पना "समाजाची लोकसंख्या समाजाची व्यापारपेठ".

काय आहे "One Brand One Community" संकल्पना -- ही संकल्पना,२१ व्या शतकात उदयोग आणि व्यापार क्षेत्रात अग्रेसर असलेले जे समाज आहेत त्यांच्या उद्योग आणि व्यापार करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करून मांडण्यात आली. या संकल्पाने नुसार समाजातील  व्यापारी , उद्योजक, निर्माते, विक्रेते, गुंतवणूकदार आणि ग्राहक एकत्रित येऊन नवीन ब्रँड तयार करून किंवा अस्तित्वात असलेल्या ब्रँड च्या माध्यमातुन व्यवसाय करून मोठ्या प्रमाणात नफा कमावतात. या संकल्पनेत व्यक्तिगत कमी लागत आणि लो रीस्क असल्याने ही संकल्पना यशस्वी झाल्याचे दिसते.

 "One Brand One Community"  या संकल्पाने नुसार आज हजारो उद्योजक आणि व्यापारी "माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ" सोबत जुळलेले आहेत. यशाचे अनुभव सांगतांना अपयशाची सुद्धा चर्चा होणे आवश्यक असते त्या नुसारच पुढील योग्य दिशा ठरते. या सर्व उद्योजक आणि व्यापारी यांची एकत्रित माहिती जेव्हा आम्ही ऑन लाईन पोर्टल वरून डायरेक्टरी च्या रूपाने समोर आणली सहा महिन्यांच्या कालावधीतच आमच्या लक्षात आले की या उद्योजकांना व व्यापाऱ्यांना पाहिजे तसा फायदा होतांना दिसत नाही. याची कारणमीमांसा करतांना लक्षात आले कि डिरेक्टरी ती छापील असो की डिजिटल असो नुसती व्यापारी किंवा उद्योजकांकडे असून चालत नाही तर ती ग्राहकाकडे सुद्धा असली पाहिजे.

ग्राहक पेठ निर्माण करण्याकरिता आमची दुसरी संकल्पना "समाजाची लोकसंख्या समाजाची व्यापारपेठ" अस्तित्वात आणायला सुरवात केली. आज माळी समाजाची लोकसंख्या अंदाजे सव्वा ते दीड करोड असण्याची शक्यता आहे. एका कुटुंबा मध्ये अंदाजे ४ सदस्य या नुसार ३५ ते ४० लाख कुटुंब असण्याची शक्यता आहे. या पैकी २ टक्के परिवार जरी बाजारपेठ करिता उपलब्ध झाले तरी लाखो करोड रुपयाचा वार्षिक व्यवसाय होऊ शकतो. या कुटुंबांना जगण्या करीता सकाळ पासून तर संध्याकाळ पर्यंत ज्या ज्या वस्तु लागत असतील त्या त्या वस्तु ची विक्री आणि निर्मिती समाजाच्या अंतर्गत सुरु  करण्याची योजना तयार करून या संकल्पनेवर आम्ही काम करायला सुरवात केली. या करिता माळी महासंघाच्या माध्यमातून गावपातळी पासून तर राज्य पातळी पर्यंत समाजातुन प्रतिनिधी तयार करण्याची मोहीम सुरु झाली. सामाजिक संघटना माळी महासंघ हि धर्मादाय आयुक्त कायद्यानुसार रजिस्टर केलेली संस्था आहे तर माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ हि केंद्र शासनाच्या कंपनी ऍक्ट नुसार नॉन प्रॉफिट कंपनी आहे. या दोनही संस्थांना सभासद नोंदणी चा अधिकार आहे. या अधिकाराचा उपयोग करून माळी महासंघ द्वारा सदस्यता नोंदणि च्या माध्यमातून समाज जोडणी सुरु आहे. मी स्वतः कम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्याने सभासद नोंदणी प्रक्रिया हि पूर्णपणे डिजिटलाईझ करून बाजारपेठ तयार करण्याचे काम जोरात सुरु आहे. या सर्व प्रक्रिये मध्ये व्यापारी, शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार, दुकानदार, नोकरदार, कामगार, बेरोजगार, वकील, डॉक्टर, कलाकार, शिक्षक, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, महिला आणि  विद्यार्थी या सर्वांचे वर्गीकरण करून त्या त्या प्रमाणे व्यवस्था निर्माण करण्याचे काम सुरु आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या या युगा मधे कोणतीही संकल्पना राबवायची असेल तर वर्गीकृत माहिती आवश्यक आहे आणि हे काम माळी महासंघ च्या माध्यमातून पुढे जात आहे. २०१८ पासून माळी महासंघ कडे महाराष्ट्रातील हजारो कुटुंबाची माहिती संकलित झाली आहे आणि दर रोज १० ते १५ कुटुंबांची यात भर पडत आहे. आमच्या दृष्टीने हि अतिशय चांगली सुरवात आहे.

कोणतीही नवीन संकल्पना मांडली कि ती संकल्पना मांडणाऱ्याचा उद्देशावर पहिले शंका उपस्थित केली जाते. आमच्या उद्देशावर सुद्धा काहींनी शंका घेतली परंतु काळ हेच यावर उत्तर आहे हे आम्हाला माहित असल्याने आम्ही काम करत गेलो. आज सहा वर्षाच्या कालावधीनंतर समाज मध्ये उद्योग आणि व्यापार यावर चर्चा सुरु झाली यातच आमचे यश आहे असे आम्ही मानतो. या वर्षभरातील जवळपास सर्वच समारंभातील सभा मधून हाच विषय मांडण्या साठी आयोजकांनी मला विनंती केली होती.

काही लोकांना संकल्पना आवडते पण ते व्यक्तिगतरीत्या ती संकल्पना राबविण्याचा प्रयत्न करतात परंतु ज्या प्रमाणे आंधळ्यांच्या वस्तीत हत्ती बांधून ठेवल्यावर काही आंधळ्यांना तो हत्ती सुपासारखा वाटतो, काहींना तो दोरीसारखा वाटतो, काहींना तो लाकडाच्या ओंडक्यासारखा वाटतो परंतु संपूर्ण हत्ती चे वर्णन करायला डोळस व्यक्तीच लागतो. अशा आंधळ्यांना दृष्टी देण्याचे काम देखील आम्ही काळावरच सोपवले आहे..      

एखादा सिनेमा बनवायचा असेल तर त्याची सुरवात, शेवट,कथा पटकथा,डायलॉग,चित्रीकरण,संगीत इत्यादी सर्व बाबीची पूर्तता करण्याकरिता तयारीला काही काळ लागतो आणि तयारी पूर्ण झाल्यावर सिनेमाची शुटिंग सुरु होते आमच्या बाबतीतही "हीच ती वेळ आहे" शूटिंग ला सुरवात झाली आहे...

२०१४ साली समाजातील उद्योजक, व्यापारी,निर्माते,आणि विक्रेते यांचा व्यवसाय वाढीकरिता आणि बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याकरिता मांडण्यात आलेल्या दोन्ही संकल्पनाना मूर्तरूप देण्याकरिता चार टप्पे निश्चित करण्यात आले.. २०१६ साली पहिला टप्पा माळी उद्योजक फोरम ची स्थापना करून प्रदर्शनी, चर्चासत्र, सेमिनार इत्यादी संसाधनांचा वापर करून वातावरण निर्मिती ,दुसरा टप्पा २०१८ साली माळी महासंघाच्या माध्यमातुन बाजारपेठ निर्माण करण्याच्या दृष्टीने सुरवात. २०२० साली तिसरा टप्पा डिजिटल मार्केटिंग…. लवकरच अमॅझॉन ,फ्लीपकार्ट, बकेटलीस्ट सारखं ऑन लाईन पोर्टल खरेदी विक्री केंद्र आम्ही समाजातील व्यापारी आणि उद्योजक यांचे करिता समाजाच्या सेवेत आणतो आहे. या पोर्टल वर विक्री करीता माल फक्त माळी समाजाचे निर्माते आणि विक्रेते यांचाच राहील ग्राहक मात्र संपूर्ण जगातील नागरिक असतील……….(क्रमशः)

 

अविनाश ठाकरे

उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)

महाराष्ट्र राज्य ओबीसी महामंडळ

अध्यक्ष माळी महासंघ

चेअरमन

माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ