Back

बातम्या

माळी महासंघ पदाधिकारी पुनर्रचना लवकरच होणार : त्रैवार्षिक निवडणुकीची तयारी सुरु : माळी महासंघ महासचिव श्री. रवींद्र अंबाडकरDate: 21-Jan-2020


माळी महासंघ च्या राज्य घटनेनुसार दर तीन वर्षांनी माळी महासंघ ची पदाधिकारी निवड किंवा नियुक्ती करणे बंधनकारक आहे. येत्या ३१ मार्च रोजी माळी महासंघ च्या सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या कार्यकारिणी चा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने नवीन कार्यकारिणी गठन करण्याच्या  प्रक्रियेला १ फेब्रुवारी पासून सुरवात होणार आहे. माळी महासंघ च्या आजीवन सभासदांनाच पदाधिकारी बनण्याचा अधिकार असल्याने ३१ मार्च २०२० पर्यंत नोंदणी झालेल्या आजीवन सभासदांना येणाऱ्या त्रैवार्षिक  ग्राम कार्यकारिणी, (शहर असेल तर ब्लॉक कार्यकारिणी), तालुका कार्यकारिणी, (शहर असेल तर विधानसभा कार्यकारिणी) , जिल्हा-शहर  कार्यकारिणी, विभाग कार्यकारिणी आणि  प्रदेश कार्यकारिणी मध्ये स्थान देण्यात येईल.  मुख्य कार्यकारिणी सोबतच माळी महासंघाच्या महिला दल, युवा दल, जेष्ठ नागरिक दल, विधी व न्याय  दल, सांस्कृतिक व क्रीडा  दल, शिक्षक दल,  इंजिनीअर दल , वैद्यकीय सेवा दल, कर्मचारी दल अशा एकूण १० आघाड्यांच्या कार्यकारिकार्यकारिणी  घोषणा सुद्धा करण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यकारिणी मधे १- अध्यक्ष , १-महासचिव २-उपाध्यक्ष ,२- सचिव,१-कोषाध्यक्ष ,१- सहकोषाध्यक्ष ,१- प्रसिद्धी प्रमुख आणि २ सदस्य असे एकूण ११ पदाधिकारी असतील. ग्राम किंवा ब्लॉक कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी (शहर असेल तर विधानसभा कार्यकारिणी), शहर- जिल्हा कार्यकारिणी , विभाग कार्यकारिणी आणि प्रदेश कार्यकारिणी या क्रमाने कार्यकारिणी चे गठन करण्यात येईल. अस्तित्वात असलेल्या कार्यकारिणीतल्या पदाधिकाऱ्यांना परफॉर्मन्स ऑडिट नुसार संधी देण्यात येईल. सद्यस्थितीत सभासद नोंदणी सुरु असून ऑन लाईन नोंदणी ची प्रक्रिया सध्या सुरु आहे व ऑन लाईन सभासद नोंदणी करीता   malimahasangh.org या वेब साईट वर सुविधा उपलब्ध आहे. पदाधिकारी निवडणुकी करिता विभाग निहाय व  जिल्हा  निहाय निवडणूक अधिकारी नेमण्यात येईल व या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात प्रक्रिया पार पाडण्यात येईल. निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच घोषित करण्यात येणार असून या दृष्टीने पदाधिकाऱ्यांनी सभासद नोंदणी प्रक्रियेला गती द्यावी असे आवाहन माळी महासंघ चे महासचिव श्री. रवींद्र अंबाडकर यांनी केले आहे.